कुमुदिनी दांडेकर - लेख सूची

आरोग्यमंत्र्यांचा आशावाद व तरुणाईतले मनुष्यबळ

“जर वीज असेल तर लोक दूरदर्शनसंचावरील कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत पाहतील व मग उशिरा झोपल्याने मुले होणार नाहीत” असे आरोग्यमंत्री म्हणाल्याचे वर्तमानपत्रीं वाचले. त्याचबरोबर महेश भट्टांसारखे सिनेमातज्ज्ञ म्हणाले की “उत्तम मनोरंजन हे एक संततिनियमनाचे उत्तम साधन आहे.” सारांश, लोकसंख्यावाढीचा प्रश्न अजून अस्तित्वात आहे, तो संपलेला नाही, याची जाणीव आजही कोठेतरी आहे व ही वाढ रोखण्यासाठी साधनेही …

रोजगार हमी योजना: महाराष्ट्रातील अनुभव

लोकसभेने भारताकरिता रोजगार हमी योजनेचा कायदा करू घातला व भारतातील सर्व गरजूंना रोजगाराची हमी देण्याचे ठरविले. त्यासाठी मोठीच रक्कम मंजूर झाल्याचे समाधान लाभले. परंतु याच सुमारास सोलापूर जिल्ह्यात ९.१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने भारताची हजारो कोटींची रक्कम अशीच उधळली जाण्याची कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहिली नाही व आज गेल्या तीस वर्षे महाराष्ट्रात चालू असलेल्या रोहयो कडे …

नगरांचे आधुनिकत्व आणि राष्ट्रीय वैभव टिकविण्याची शक्यता

महानगरातील म्हणजे विशेषतः मुंबईतील नागरीकरणाच्या चर्चेत पूर्वीच्या काही लेखांत झोपडपट्ट्यांचीच चर्चा झाली. त्याला कारण १९९८-९९ च्या काही पाहण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत हरत-हेची माहिती मिळाली. ती दुर्लक्षिण्यासारखी नव्हती. परंतु हे विसरून चालणार नाही की नागरीकरण हे राष्ट्राचे वैभव आहे. त्यात अनेक हव्याहव्याशा गोष्टी होत असतात. उदाहरणार्थ मुंबईचीच गोष्ट घ्या. मुंबई शहराला एके काळी ‘मोहमयी’ …

झोपडपट्ट्या व नागरीकरण

नागरीकरणाची जी व्याख्या आहे तीप्रमाणे जेव्हा मनुष्यवस्ती पाच हजारांपेक्षा जास्त असते व पाऊणपेक्षा जास्त पुरुष बिनशेतीधंद्यात काम करतात तेव्हा त्या वस्तीला नगर (Town) म्हणतात. उरलेल्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. जेव्हा ग्रामीण वस्ती लोकसंख्येमुळे व व्यवसायांमुळे नागरी बनते त्या घटनेला नागरीकरण म्हणतात. ह्या घटनेमागे नगरांमध्ये बिनशेतकी व्यवसायाची वाढ असते. हे नागरीकरण वाढत जाऊन लोकांची आर्थिक परिस्थिती …

महानगराची वाढ = झोपडपट्टीची वाढ

नागरीकरणामध्ये दोन त-हेच्या नगरांची वाढ लक्षात घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे मुंबईसारखी महानगरे ज्याला metropolitan cities म्हणतात. महाराष्ट्रात अशी मोठी महानगरे इतर नाहीत. मुंबईसारख्या नगरांची रोगिष्ट वाढ ४० ४५ वर्षांपूर्वीच लक्षात येऊन मुंबईची अधिक वाढ थांबविण्यासाठी बरेच उपाय केले जात होते. त्यात मुख्य म्हणजे उद्योगधंद्याचे विकेन्द्रीकरण करण्याकडे लक्ष दिले जात होते. त्यामुळेच पुणे, नाशिक, अहमदनगर, …

सतीची चाल, पुनर्विवाह बंदी, बालविवाह आणि . . . जातिभेद??

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जातिभेदावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्याची जरूरही होती, कारण अस्पृश्यतेने त्यापूर्वी धुमाकूळ घातला होता. ब्रिटिश राज्यात जगभर त्याला कुप्रसिद्धी मिळून एकूण हिंदू धर्मीयांची निंदा झाली. हिंदू म्हटले की ‘काहीतरी किळसवाणे’ असा सर्वत्र समज झाला. तसे पाहता सर्वच समाजात class consciousness किंवा काही त-हेची गुलामी होती. परंतु जन्मतःच जातिभेदाने फुटीर होणारा समाज …

भारतीय संस्कृती व गर्भपात (उत्तरार्ध)

भारतामध्ये सुरुवातीपासून शस्त्रक्रियेवर अवलंबून राहण्याची परंपरा सुरू झाली. त्यालाही 1953 च्या सुमारास ‘bad in taste’ संबोधिले गेले तरी जगात सर्व ठिकाणी हळूहळू त्याचा वापर वाढीस लागला. येथे नोंदवावेसे वाटते की भारतात बऱ्याच भागात संतति-नियमन करण्याची आंतरिक इच्छाच नव्हती. त्यामुळे गर्भपात, शस्त्रक्रिया किंवा कोठल्याच उपलब्ध मार्गांचा आधार घेण्याची बहुजनांना तितक्या प्रमाणात जरूरी वाटली नाही. आजही बऱ्याच …

भारतीय संस्कृती व गर्भपात (पूर्वार्ध)

भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान अत्यन्त गौण मानले जाते. स्त्रियांना देवतेसमान मानले जाते हे नुसते काव्य— -कदाचित ढोंगच—-स्त्रीच्या गौण स्थानाचा गवगवा 1975 सालच्या सुमारास विशेष झाला. त्याला कारण त्यावेळी स्त्रीच्या गौण स्थानामुळे लोकसंख्येचा प्र न सुटण्यामध्ये अनेक अडथळे येत असल्याची तीव्र जाणीव झाली वरच्या वर्गातील मूठभर स्त्रियांनी सभा भरविल्या, लेख लिहिले, आंतरराष्ट्रीय सभांमधून या जाणिवेचा जयघोष …

धर्म आणि लोकसंख्या

हा लेख म्हणजे एका पुस्तकाचे समीक्षण आहे. हे पुस्तक श्रिया अय्यर यांनी लिहून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या छापखान्याने २००२ मध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यात २६६ पाने आहेत व त्याची किंमत ५९५ रुपये आहे. ह्या पुस्तकाचे नाव ‘Demography and Religion’ असे आहे. थोडक्यात धर्म व लोकसंख्येबाबतचे प्र न असे त्याचे स्वरूप आहे. धर्म व लोकसंख्या नियंत्रण हा विषय …

संस्कृती व लग्नाचे वय

भारताची संस्कृती फार उच्च दर्जाची आहे, पाश्चात्त्य देशांमध्ये नीती खालच्या दर्जाची आहे, अशी एक समजूत आपल्यात आहे. आजची नाही तर गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. आपली संस्कृती वरच्या दर्जाची असण्याची जी अनेक कारणे मानली जातात, त्यांत लवकर लग्न करणे हे एक, आणि स्त्रियांच्या बाबत ९९ टक्के स्त्रिया व पुरुष दोघांचीही दुराचाराची शक्यता कमी होते …

वृद्धांच्या समस्या (२)

बऱ्याच वेळी पुढारलेल्या पा चात्त्य देशांत ज्या विषयांची चर्चा चालत असते त्याच विषयांची चर्चा सहाजिकच भारतातही चालते. भारतासारख्या गरीब देशाशी तुलना करता ह्या संपन्न देशात आर्थिक प्र न वेगळे किंवा जवळजवळ सुटलेले आहेत. त्यांच्याकडे कुटुंबसंस्था, स्त्रियांच्या घराबाहेर जाऊन केलेल्या नोकऱ्या, व्यक्तिस्वातन्त्र्य, व्यक्तिमत्त्वाचा विकास व त्यामुळे असणारी किंवा वाढणारी स्वयं-केन्द्रितता हे प्र न जास्त प्रकर्षाने जाणवतात. …

साडेचार दिवसांचा स्वर्गनिवास ( १ )

पाश्चात्त्य समाजात वृद्धाना कोणी विचारत नाही हे खरे आहे का? आमच्याकडील वृद्धांचे जे समाधान आहे ते अज्ञान आणि जाणीवेचा अभाव यामुळे की आमच्या तत्त्वज्ञानामुळे? देह जर्जर अन् व्याधिग्रस्त झाला की, गंगाजल हेच औषध आणि नारायणहरि हाच वैद्य – ही विचारधारा पुरेशी आहे? माझी एक वृद्ध मैत्रीण अमेरिकेत असते. वय ७९; वजन २१५ पौंड; उंची ५ …

रोजगार हमी योजना (रोहयो)

रोजगार हमी योजना सुरू झाल्याला जवळ-जवळ पंचवीस वर्षे होऊन गेली. त्यामुळे ह्याबाबत पुनर्विचार करणे फार महत्त्वाचे झाले आहे. रोहयोचे महत्त्व जाणूनच जगभर ह्या योजनेचे मूल्यमापन झाले व त्यात काही दोष असले तर ते काढून टाकून ही योजना राबवावी असा एक सूर होता. अर्थात बदलत्या राजकीय परिस्थितीत कोठल्याही विधायक कार्याची उपेक्षा होते आहे त्यात रोहयोचीही झाली …

झोपडपट्टी संस्कृती : उत्तर प्रदेशची व तामिळनाडूची

दिल्लीमध्ये पावणेदोन लक्ष वस्तीची एक वसाहत स्थापलेली होती. त्यात भारतामधील सर्व राज्यांतील पोटापाण्यासाठी तेथे गेलेले लोक राहत होते. हे लोक मोलमजुरी करणारे, किंवा निश्चित स्वरूपाचे मासिक उत्पन्न असलेले असे नव्हते. त्यांचा एक सर्वसमावेशी गुण म्हणजे गरिबी. त्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून ५ यार्ड x ५ यार्ड असा जमिनीचा तुकडा मिळालेला होता. त्यावर घर बांधण्यासाठी दोन हजार …

पुदुकोट्टाई – एक अनुभव

पुदुकोट्टाई हा एक तामिळनाडू राज्यातील जिल्हा. हा भारताच्या अगदी आग्नेयेला, बंगालच्या उपसागराला लागून आहे. अत्यंत मागासलेला जिल्हा. गरिबी, निरक्षरता अगदी भारतीय परिमाणानेही भरपूर. सामाजिक व आर्थिक विकासाला पूर्ण पारखा! अशा या जिल्ह्यात १९९० नंतर प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारताच्या अंदाजे ४७० जिल्ह्यांत १९९० च्या सुमारास सुरू केला गेला. त्या अन्वये …